कैद्यांसाठी श्रीमद्भगवद्गीतेचे वाटप: इस्कॉन भुसावळचा प्रेरणादायक उपक्रम

0

भुसावळ | श्रीमद्भगवद्गीता जयंती आणि नववर्षाच्या निमित्ताने, इस्कॉन भुसावळतर्फे दुय्यम कारागृह भुसावळ येथे 27 कैद्यांना श्रीमद्भगवद्गीतेचे मोफत वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांच्या 13 डिसेंबर 2024 रोजीच्या परवानगीनुसार अनुमती देण्यात आली होती.

कार्यक्रमाचे उद्दिष्ट कैद्यांना गीतेच्या आधारे जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी प्रेरित करणे होते.श्रीमद्भगवद्गीता जीवनातील ताण-तणाव कमी करून मनःशांती आणि सद्गुण वाढवण्यासाठी उपयोगी असल्याचे सांगण्यात आले. तसेच
गीतेच्या विचारांद्वारे आत्मविकास आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा साधता येईल, यावर मार्गदर्शन देण्यात आले .इस्कॉन भुसावळचे अध्यक्ष श्रीमान रास यात्रा दास, जितेंद्र प्रभुजी, संजय भारंबे आणि श्री पाईकराव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित कारागृह स्टाफनेही सहकार्य केले. कार्यक्रमाने कैद्यांमध्ये आशा निर्माण केली असून, त्यांच्या जीवनात नवीन अध्याय सुरू करण्यास प्रेरणा दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.