सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी घेतली लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात

0

जळगाव । जळगाव लाच लुचपत विभागाने एक मोठी कारवाई केली. सातबारा उताऱ्यावर आई व भावाचे नाव, तसेच स्लॅब रजिस्ट्ररवर नाव लावण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेतला कुसुंबा येथील तलाठ्याला रंगेहात अटक केली. नितीन शेषराव भोई वय-३१, रा. जळगाव असे लाचखोर तलाठ्याने नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून त्यांनी कुसुंबा येथील तलाठी यांच्या कार्यालयात सातबारा उताऱ्यावर आई व भावाचे नाव लावण्यासाठी तसेच स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तलाठी नितीन भोई यांनी तक्रार यांच्याकडे सुरुवातीला ५ हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान तडजोड अंती अखेर ३ हजार रूपये देण्याचे ठरले.

या अनुषंगाने तक्रारदार यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार केली. त्यानुसार पडताळणीसाठी पथकाने मंगळवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुपारास ३ हजार रुपयांची लाच घेतांना तलाठी नितीन भोई याला रंगेहात पकडले. दरम्यान या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.