महाराष्ट्रातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या ; कोणाची कुठे बदली?
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ लागल्या असून यात आणखी १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या आठवड्याभरात सनदी अधिकारी हर्षदीप कांबळे यांची दुसऱ्यांदा बदली झाली आहे.
विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
डॉ.हर्षदीप कांबळे यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मिलिंद म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बी. वेणुगोपाल रेड्डी, अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
विनिता वैद सिंगल, प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती
संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
जितेंद्र दुडी जिल्हाधिकारी, सातारा यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
I.A.कुंदन , प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती
डॉ. निपुण विनायक यांची प्रकल्प संचालक, RUSA, उच्च तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांना सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई नियुक्ती करण्यात आली आहे.
जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांची सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती
डॉ. सुहास दिवसे जिल्हाधिकारी, पुणे यांची सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती