नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तब्बल १४ जणांवर तडीपारीची कारवाई

0

नाशिक : बाजारात बंदी असलेला मांजा सर्रासपणे विक्री होताना दिसत असून अशांविरोधात नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून अनधिकृत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तब्बल १४ जणांवर आतापर्यंत तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात देखील पतंगोत्सव साजरा केला जात आहे. यासाठी धोकेदायक असलेला मांजाचा वापर केला जात आहे. मांजामुळे दरवर्षी अनेकजण जखमी होतात. तर काहींना यामुळे जीव गमवावा लागत असतो. यामुळे या मांजा विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी देखील अवैधरित्या सर्रासपणे मांजाची विक्री व वापर देखील होत असल्याचे पाहण्यास मिळते. अशांवर कारवाई करण्यात येत आहे.

१४ जणांवर तडीपारीची कारवाई
अवघ्या पंधरा दिवसांवर मकरसंक्रांती आली आहे. यामुळे आकाशात पतंग उडताना दिसू लागले आहेत. मात्र नाशिक शहरात बंदी असलेला मांजा विक्री अवैधपणे सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. या विरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत तब्बल २२ गुन्हे दाखल करत १४ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

तर मोक्का अंतर्गत कारवाई
नायलॉन मांजा वापरामुळे अनेक जण जखमी होत आहेत. यामुळे नागरिकांनी देखील पतंग उडवतांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनि केले आहे. यानुसार काही जणांवर कारवाई झाली आहे. तरी देखील मांजा विक्री किंवा वापर करताना आढळून आल्यास वेळ पडली तर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.