भाजपला नंदुरबारमध्ये मोठा हादरा ! हा बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
नंदुरबार । आगामी विधानसभा निवडणुकीआधीच भाजपला लागलेली गळती थांबताना दिसत नाहीय. आता अशातच भाजपला नंदुरबारमध्ये मोठा झटका मिळाला आहे.
मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे आता नंदुरबारमध्ये भाजपचे टेन्शन वाढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र गावित हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देताना आगामी विधानसभेत शहादा-तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे ते काँग्रेसच्या तिकीटावर ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे.