आमच्यासोबत या, तुम्हाला केंद्रात मंत्री करतो; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर

0

मुंबई । केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर दिली आहे. तुम्ही आमच्यासोबत या, तुम्हाला केंद्रात मंत्री करतो. तुम्हाला मंत्रिपद देण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो. शी ऑफरच रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली. प्रकाश आंबेडकर जर पुढाकार घेत असतील तर मी अध्यक्षपदासाठी आग्रही राहणार नाही. माझी पॉझिटिव्ह भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एकीकृत रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्ष व्हावं. माझा त्यांना पाठिंबा राहील. काहीही झालं तरी प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ऐक्य शक्यच नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी हजेरी लावली. यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही ऑफर दिली. एवढ्या निवडणुका लढवूनही प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मान्यता मिळत नाही. त्यांचे उमेदवार निवडून येत नाही. त्यामुळे त्यांनी आता एनडीएत यावे. त्यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी मी मदत करेल. नाही तर माझं मंत्रिपदही मी त्यांना द्यायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर ते आतापर्यंत उपमुख्यमंत्री बनू शकले असते, असं रामदास आठवले म्हणाले.

सत्ता येत नाही
आम्ही दोघे एकत्र असतो तर त्याचा मोठा फायदा झाला असता. त्यांनी माझ्यासोबत यायला पाहिजे. त्यामुळे बहुजन एकत्रित येतील. त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत यावं. त्यांनी सोबत यायला पाहिजे. एकटे राहून सत्तेत येता येत नाही, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.