माजी सभापती गोपाळा लहांगे यांच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी वाडीवऱ्हेत आढावा बैठक
पाठीशी राहण्याचा गावकऱ्यांचा निर्णय.. ( भागीरथ आतकरी)
इगतपुरी:
विधानसभा निवडणुकीसाठी योग्य काही महिने शिल्लक असताना आतापासूनच विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांची चाचणी सुरू आहे त्यातच इगतपुरी त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल मतदारसंघांमध्ये उमेदवारी करण्यासाठी वाडीवऱ्हे चे माजी सरपंच तथा इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळा लहांगे हे इच्छुक असून खेडोपाडी गावोगावी त्यांनी आढावा बैठकांचा सपाटा लावला आहे. व त्यातून त्यांना मतदारसंघातील नागरिकांचा चांगलाच पाठिंबा देखील मिळत आहे. राज्यातील बदललेले राजकीय समीकरण व त्यामुळे जागा वाटपाचा निर्माण होणारा तिढा यामुळे कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा मिळणार, कोणता पक्ष कोणत्या जागेवर हक्क सांगणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष, आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची महविकास आघाडी तर दुसऱ्या बाजूला भाजप,शिवसेना शिंदे गट,आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती आहे. त्यामुळे आघाडी आणि युती यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणता पक्ष निवडणूक लढणार आहे. यावर इच्छुकांच्या आशा आकांक्षा अवलंबून आहे.
याच अनुषंगाने आज इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी गोपाळा लहांगे यांनी वाडीवऱ्हे येथे बैठक आयोजित केली होती बैठकीसाठी गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी बोलताना सांगितले की वाडीवऱ्हे सारख्या मोठ्या गावातून गोपाळा लहांगे यांनी उमेदवारी केल्यास वाडीवऱ्हे गाव आणि परिसराचा संपूर्ण पाठिंबा गोपाळा लहांगे यांना असेल. साम दाम दंड भेद या उक्ती प्रमाणे सर्व ग्रामस्थ गोपाळा लहांगे यांच्या सोबत राहतील अशी ग्वाही या आढावा बैठकीत ग्रामस्थांनी दिली.
यावेळी बोलतांना गोपाळा लहांगे यांनी मतदार संघातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मी उमेदवारी करण्यास इच्छुक आहे.त्यासाठी सर्व गावकरी एकदिलाने,आणि एक विचाराने एकत्र आले आहे.त्यामुळे मला लढण्यासाठी बळ मिळालं आहे.मी तुमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
——
आतापर्यंत इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघांमध्ये परक्या लोकांनीच अतिक्रमण करून साम्राज्य उभे केले आहे तर मात्र आता ही वेळ आपल्या स्थानिक नेत्याच्या पाठीमागे उभे राहण्याची असून सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन माजी सभापती गोपाळाहांगे यांना पाठिंबा द्यावा आणि विधानसभेचे उमेदवार म्हणून यांनाच घोषित करून मी आज त्यांना पाठिंबा देत आहे आणि इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुका ही त्यांच्या पाठीशी उभा राहिला असा मला विश्वास आहे
रामदास बाबा मालुंजकर (जेष्ठ नागरिक )