मुक्ताईनगरला २२ लाखांचा गुटखा पकडला

0

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या आठवड्यात एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. – आता दि. २४ रोजी सायंकाळी – पोलिसांनी पुन्हा एकदा चारचाकी वाहनातून २२ लाख ३८ हजार ५० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई खामखेडा स्मशानभूमीजवळ करण्यात आली.

ब-हाणपूरहून शहराकडे येणारे – चारचाकी वाहन क्रमांक (एम.एच.२७ – डीएल २४९६) पोलिसांनी रोखले. – वाहनाची तपासणी केली. त्यात प्रतिबंधित तंबाखू होती. त्याची किंमत २२,३८,०५० रुपये आहे. पोलिसांनी हे वाहन जप्त केले. आणि गुटखा ताब्यात घेतला याप्रकरणी अजीज शेख बाबू (वय ३६) रा. झाशी नगर, रिसोड, जि. वाशिम याला ताब्यात घेतले. मुक्ताईनगरचे पोलिस उपअधीक्षक राजकुमार शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

विजय करपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर, उपनिरीक्षक राजेंद्र खनके, पोहेकॉ छोटू वैद्य, पोलिस नाईक देवसिंग तायडे, कॉ. विशाल सपकाळे, निखिल नारखेडे यांनी केली. तपास पोउनि राहुल बोरकर करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.