हज यात्रेला उन्हाचा तडाखा; आतापर्यंत 90 भारतीय भाविकांचा मृत्यू
सौदी अरेबियातील मक्केमध्ये सध्या हज यात्रा सुरू आहे. सौदीमधील तीव्र उष्णतेमुळे 550 भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये इजिप्तचे 323 तर जॉर्डनच्या 60 भाविकांचा समावेश आहे. इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल या देशांमधल्या नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे.
तर हजारोंच्या संख्य़ेनं भाविक आजारी पडतायेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मक्केच्या ग्रँड मशिदीत सोमवारी 51.8 अंश सेल्सियस इतकं तापमान होतं. गेल्या वर्षी देखील मक्केमध्ये 240 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यंदा मृतांचा आकडा 550 वर गेला आहे.
दरम्यान आतापर्यंत 90 भारतीय भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलीय डिप्लोमॅटच्या मते, अनेक मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे आणि वृद्धांचे झाले आहेत, तर काही मृत्यू अति उष्णतेमुळे झाले आहेत. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबाबत भारत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.