राजोरे येथील तरुणाची २७ लाखांत फसवणूक

0

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील राजोरे गावातील ३६ वर्षीय तरुणाची दोन अज्ञातांनी ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा करून देण्याच्या बहाण्याने तब्बल २६ लाख ७४ हजारांत फसवणूक केली. दोघांनी सदर तरुणाला टेलिग्रामवर एक लिंक पाठवला. विश्वास संपादन करून त्याला (नोंदणी) रजिस्ट्रेशन करायला लावले. यानंतर फसवणूक केली.

या प्रकरणी जळगाव येथे सायबर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. राजोरे येथील रहिवासी चेतन विनायक नेहेते (वय ३६) याला टेलिग्राम या सोशल साइटवर दीपक राज व लेझर्ड एव्हीलीन नामक सोशल नेटवर्कवरील आयडी असलेल्या दोघांनी संपर्क साधला. चेतनचा विश्वास संपादन करून आम्ही तुम्हाला ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा करून देऊ, असे आमिष दाखवले.

१० मे ते ६ जून २०२४ या दरम्यान वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात २६ लाख ७४ हजार रुपयाची रक्कम घेतली. ही रक्कम परत न करता फसवणूक केली. ही बाब लक्षात येताच चेतन नेहेते याने थेट जळगाव येथील सायबर पोलिस ठाणे गाठून दीपक राज व लेझर्ड एव्हीलीन नामक दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.