चित्रपटसृष्टीतून धक्कादायक बातमी ! मुंबईत प्रसिद्ध अभिनेत्रीने संपविले जीवन, घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला मुतदेह

0

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल नूर मलाबिकाचा मृत्यू झाला आहे. नूर मलाबिकाने स्वतः च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी ६ जून रोजी लोखंडवाला येथे एका फ्लॅटमधून तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. नूर मलाबिका ही फक्त ३७ वर्षांची होती. पोलिस याप्रकरणी तपासणी करत आहेत. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नूर मलाबिकाच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली होती. शेजारच्यांनी ही माहिती ओशिवरा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अभिनेत्रीच्या घराचा दरवाजा तोडला. आत गेल्यावर अभिनेत्रीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेला आढळून आला. पोलिसांनी ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच तिच्या घराची झडती घेतली आहे. त्यात तिचे गोळ्या-औषधे, मोबाईल फोन, डायरी जप्त करण्यात आली आहे.

गोरेगावच्या सिद्धार्थ हॉस्पिलमध्ये तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणीही समोर आले नाही. त्यामुळे बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या एनजीओच्या मदतीने अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ९ जूनला तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

नूर मलाबिका ही मूळची आसामची होती. तिने अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. नूर मलाबिकाने ‘द ट्रायल’ या वेबसीरीजमध्ये काजोल आणि जिशु सेनगुप्ता यांच्यासोबत दिसली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.