जळगाव आणि रावेरमध्ये दुसऱ्या फेरीतही भाजपचे उमेदवार आघाडीवर
जळगाव । आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान, दुस-या फेरी नंतर जळगाव मतदार संघात महायुतीचे स्मिता वाघ व रावेर मधुन रक्षा खडसे आघाडीवर आहे. रक्षा खडसे यांना दुसऱ्या फेरीमध्ये ३६ हजार ३३२ मतांनी पुढे तर स्मिता वाघ ४३,४९६ मतांनी पुढे आहे.
जळगाव मतदार संघात पोस्टल मतमोजणीत करण पवार पुढे होते. त्यानंतर इव्हिएम मतमोजणीत पहिल्या व दुसऱ्या फेरीत चांगले मतदाधिक्य मिळत ४३ हजार ४९६ मतांनी पुढे आहे. तर रावेर मतदार संघात संघात पोस्टल मतमोजणीसह, पहिल्या व दुसऱ्या फेरीपासून रक्षा खडसे या चांगल्या मताधिक्यांनी पुढे आहेत.