महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार ; आयएमडीचा अंदाज

0

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र अद्यापही मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे राज्यात पाऊस कधी हजेरी लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मान्सून केरळमध्ये कधी हजेरी लावणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच आता केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. यंदाच्या वर्षी देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यानंदाच्या वर्षी महाराष्ट्रात पाऊस १०६ टक्के अधिक असणार आहे. तसेच येत्या दोन, तीन दिवसानानंतर म्हणजेच जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पाऊस जास्त पडणार असल्याचा अंदाज आहे.

जून महिन्यामध्ये एल-निनो निष्क्रिय अवस्थेत जाणार आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या काळात ला-निना स्थिती सक्रिय होणार आहे. या सगळ्याचा थेट परिणाम जून ते जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 10 ते 12 जूनला मुंबईमध्ये पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील कित्येक जिल्ह्यांत हजेरी देखील लावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.