प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत जिल्ह्यात ५२ संधी उपलब्ध

0

जळगाव । केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या तिसऱ्या फेरीअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांमध्ये एकूण ५२ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिपची संधी मिळणार असून, त्यांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच इंटर्नशिपसाठी रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ६ हजार रुपयांचे एकरकमी अनुदान देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात एपीटी ग्लोबल लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये या संधी उपलब्ध आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवार पात्र आहेत.

पात्र उमेदवारांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी [https://pminternship.mca.gov.in] या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.