जळगावमध्ये मोठा राडा, RSS च्या पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न
जळगावमध्ये मोठा राडा झाला आहे. जळगावच्या किनगावात आरएसएसच्या पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने किनगावात खलबळ उडाली आहे. या दगडफेकीच्या प्रयत्नानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली. दगडफेकीमुळे परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. काहींनी एकच धावाधाव केली. पोलीसही मोठ्या संख्येने उपस्थित झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या यावल तालुक्यातील किनगावात आरएसएसकडून पथसंचलन सुरू होतं. पथसंचलन सुरू असतानाच दगडफेकीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेने किनगावात गोंधळ निर्माण झाला. आरएसएसच्या रॅलीला एका गटाने विरोध होता. त्यानंतर हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देथील पथसंचलन सुरू होते. सौम्य लाठीचार्ज सुरू केल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना अनेक सूचना देखील केल्या. कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

