जबलपूर–कोयंबतूर विशेष एक्सप्रेस नियमित
भुसावळ : भुसावळसह मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. जबलपूर ते कोयंबतूरदरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचे नियमित सेवेत रूपांतर करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे भुसावळहून दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

२३ ऑक्टोबरपासून नियमित सेवा


गाडी क्रमांक २०१६० जबलपूर-कोयंबतूर एक्सप्रेस २३ ऑक्टोबरपासून प्रत्येक शुक्रवारी जबलपूरहून रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी रविवारी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी कोयंबतूरला पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक २०१५९ कोयंबतूर-जबलपूर एक्सप्रेस २६ ऑक्टोबरपासून प्रत्येक सोमवारी कोयंबतूरहून सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी सुटणार असून, बुधवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी जबलपूरला पोहोचणार आहे.
भुसावळसह प्रमुख स्थानकांवर थांबा
या एक्सप्रेसला मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामध्ये नरसिंहपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा आणि भुसावळ या स्थानकांनंतर गाडी नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम आणि मडगाव, कारवार, कुमटा, मूकाम्बिका रोड-बिंदूर, कुंदापूर, उडुपी, मुलकी, मंगळुरू, कासारगोड, कन्नूर, वडकारा, कोझिकोड, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पलक्कड़ या स्थानकांवर गाडीला थांबा देण्यात आला आहे.
विशेष गाडीचे नियमित सेवेत रूपांतर झाल्याने भुसावळ आणि परिसरातील प्रवाशांना दक्षिण भारतातील विविध शहरांशी रेल्वेने जोडले जाणार आहे. नियमित सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.