जळगाव विधानपरिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन दणदणीत विजय !

0

जळगाव । जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुती तथा भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीतच महाजन यांनी तब्बल ५८२ मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

निवडणुकीसाठी एकूण ६११ वैध मते पडली. त्यापैकी नंदकिशोर महाजन यांना सर्वाधिक ५८२ मते मिळाली. तर इतर उमेदवारांमध्ये तायडे शरद श्यामलाल यांना १७, अनिल छबिलदास चौधरी यांना ११ आणि रेश्मा कुंदन काळे यांना केवळ १ मत मिळाले.

मतमोजणीदरम्यान टेबल क्रमांक १ वर महाजन यांना २०७, टेबल क्रमांक २ वर १९१ आणि टेबल क्रमांक ३ वर १८४ अशी एकूण ५८२ मते मिळाली. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांची आघाडी कायम राहिली.या निवडणुकीत ५ मते अवैध ठरली. वैध आणि अवैध मतांसह एकूण ६१६ मतांची मोजणी करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांनी दिलेल्या मतदानातून नंदकिशोर महाजन यांना मिळालेला प्रचंड पाठिंबा हा जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा पुरावा मानला जात आहे. विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष करत महाजन यांचे अभिनंदन केले.

मतांची आकडेवारी :

नंदकिशोर भगवान महाजन – ५८२ मते
तायडे शरद श्यामलाल – १७ मते
अनिल छबिलदास चौधरी – ११ मते
रेश्मा कुंदन काळे – १ मत
वैध मते – ६११
अवैध मते – ५

Leave A Reply

Your email address will not be published.