विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

0

नेस्लेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत जैन इरिगेशन, गांधी रिसर्च फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

विटनेर (ता. जळगाव) : नेस्लेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत जैन फार्म फ्रेश, गांधी रिसर्च फाऊंडेशन, समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विटनेर येथे ९ जून रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात १२१ रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला.

शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजीसह विविध तपासण्या करण्यात आल्या. गरजेनुसार औषधांचे वाटपही करण्यात आले. डॉक्टरांनी संतुलित आहार, व्यसनमुक्ती आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या प्रसंगी डॉ. यशवंती मुंढे, डिम्पल सोनवणे, प्रतीक सोनार, रणजित गोपाळ, भाईदास बारेला, आरोग्य सेवक मयूर काटोले, प्रशांत मुनीअप्पा, आशुतोष माळी तसेच जैन इरिगेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमास सरपंच नेहा साठे, ग्रामपंचायत सदस्य भूषण पाटील, कुंतेश ठोंबरे यांनी भेट दिली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत पाथरी तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार आणि अर्जून प्रसाद यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे गावात आरोग्याविषयी जनजागृती वाढली असून ग्रामस्थांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.