जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी

0

जळगाव । जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 20 वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना नंदकिशोर महाजन यांनी व्यक्त केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे, जिल्ह्यातील नेते, आमदार खासदारांचे आभार मानले.

पक्षश्रेष्ठीने माझा सारख्या सामान्य माणसावर विश्वास दर्शवला त्यासाठी मी आभारी आहे. महायुतीतील सर्वनेत्यांचेही आभार. जळगावमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे नागसेवकांच्या जोरावर विजय निश्चित आहे. मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहिलं कि पक्ष दखल घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही संधी देत न्याय देतो. हे यावरून स्पष्ट आहे. असेही नंदकिशोर महाजन म्हणाले.

भाजपाने नाव जाहीर करताच, कार्यकर्त्यांची फटाक्याची आतिशबाजी करत जल्लोष

विधान परिषद महायुतीचा उमेदवारांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील शेतकरी नंदकिशोर महाजन यांचे नाव भाजपाने जाहीर करताच, नंदकिशोर महाजन यांच्या तांदल वाडी येथील राहत्या घराच्या समोर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिश बाजी करत जल्लोष केल्याचं पाहायला मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.