प्रवाशांना मोठा दिलासा ! मध्ये रेल्वेकडून ३४ उन्हाळी विशेष गाड्या

0

भुसावळ : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्ष्यात घेऊन मध्ये रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर आणि वाराणसी दरम्यान ३४ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना भुसावळ स्थानकासह उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मे महिन्याच्या उत्तरार्धापासून सुरू होणाऱ्या या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकानुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस-सुलतानपूर साप्ताहिक विशेष गाडी (क्र. ०४२११) २१ मे ते १६ जुलै २०२६ या कालावधीत दर गुरुवारी मुंबईहून दुपारी १४:३५ वाजता सुटेल.

ही गाडी नाशिक रोड स्थानकावर सायंकाळच्या सुमारास पोहोचून पुढे सुलतानपूरकडे रवाना होईल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०४२१२ ही २० मे ते १५ जुलै दरम्यान दर बुधवारी सुलतानपूरहून पहाटे सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी मुंबईला पोहोचेल. या मार्गावर एकूण १८ फेऱ्या होणार असून, नाशिककरांना यामुळे उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरांशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

​त्याचप्रमाणे, वाराणसीसाठी देखील १६ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक ०४२२५ ही २२ मे ते १० जुलै २०२६ या काळात दर शुक्रवारी मुंबईहून सुटेल, तर गाडी क्रमांक ०४२२६ ही २१ मे ते ९ जुलै दरम्यान दर गुरुवारी वाराणसीहून मुंबईसाठी रवाना होईल. या दोन्ही गाड्यांना नाशिक रोड, चाळीसगाव आणि पाचोरा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.