जळगाव जिल्हा परिषदेवर ‘महिला राज’; ५० टक्के जागा राखीव
जळगाव । मागच्या काही काळापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लवकरच पार पडणार असून याच पार्श्वभूमीवर आज दि १३ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा परिषदेच्या ६८ जागांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण ३१, नागरीकांचा मागास प्रवर्ग १८, अनुसुचीत जाती १३ आणि अनुसुचित जमाती ६ असे एकुण ६८ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. असून या ५० टक्के आरक्षण (३४ जागा) महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यावेळेस अनेक राजकीय गणित बदलल्याने जळगाव जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग
पातोंडा, घोडेगाव, म्हसावद, शहापूर, म्हसवे, दहिवद, कासोदा, मेहुणबारे, शिरसोदे, टाकळी प्र.चा. पिंपळगाव बुद्रुक, विखरण, नाडगाव, पाळधी, पातोंडा, नेरी दिगर, भालोद, लिहे.
सर्वसाधारण प्रवर्गाकरिता
उंबरखेड, लोहटार, नगरदेवळा बुद्रुक, बांबरुड प्र.बो., बहाळ, तामसवाडी, शिरसमणी, मांडळ, गिरड, तळई, कळमसरे, पाळधी खुर्द, न्हावी प्र. यावल, लासुर, पहुरपेठ, गुढे, साळवा, कुसंबे खुर्द, तोंडापूर, कजगाव, बेटावद बुद्रुक, जानवे, रांजणगाव, हरताळे, शिरसोली प्र.न., कुन्हे प्र.न., शेलवड, साखळी, लोहारा, ऐनपूर, सायगाव.
अनुसूचित जमाती
विरवाडे, धानोरा प्र.अ., अडावद, घोडगाव, चहार्डी, हिंगोणे, किनगाव बुद्रुक, केऱ्हाळे बुद्रुक, चिनावल, कुर्ऱ्हे, कानळदा, आसोदा आणि पिंप्री खुर्द .
अनुसूचित जाती
वाघोड, निंभोरा बुद्रुक, वाघोदा बुद्रुक, अंतुर्ली, कंडारी आणि निंभोरा.