सरकार देणार १५००० रुपये, तरुणांसाठी १ लाख कोटींची योजना; PM मोदींची घोषणा

0

नवी दिल्ली । आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी देशातील तरुणांसाठी एक मोठी योजना जाहीर केली आहे.

या योजनेचे नाव’पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ असे असून या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी १ लाख कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील 3.5 कोटींहून अधिक युवकांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

या योजनेअंतर्गत ज्या तरुणांना पहिल्यांदाच खासगी क्षेत्रात नोकरी मिळेल त्यांना सरकारकडून 15,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. ही रक्कम दोन टप्प्यांत दिली जाणार आहे. पहिली मदत सहा महिने नोकरी केल्यावर दिली जाईल आणि दुसरी मदत 12 महिने नोकरी आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यावर दिली जाईल. यामुळे केवळ नोकरीच्या संधी मिळण्यासोबतच आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासही मदत होणार आहे.

नोकरी देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन
ही योजना फक्त तरुणांसाठीच नाही तर नोकरी देणाऱ्या कंपन्यांसाठीही फायदेशीर आहे. खासगी कंपन्या विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) जास्तीत जास्त लोकांना नोकरी देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. कंपन्यांना प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी दरमहा 3000 रुपये सबसिडी दिली जाईल. परंतु यासाठी तो कर्मचारी किमान सहा महिने कामावर असणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.