धक्कादायक ! तोल जावून पडल्यामुळे यावल येथील सॉफ्टवेअर अभियंता ठार

0

यावल प्रतिनिधी | शहरातील महाजन गल्लीतील २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता सोमवारी रात्री आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर होता. अचानक तोल गेल्याने तो खाली जमीनीवर कोसळला.

हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला भुसावळ येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला महाजन गल्लीतील रहिवासी अक्षय प्रमोद करांडे (वय २७) हा सोमवारी (दि.१७) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून तोल गेल्याने खाली पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंबीयांनी त्यास भुसावळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला. यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.