निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच्या राजीनाम्याने खळबळ
पुणे । एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अशातच शरद पवार गटात मोठा भूकंप झाला आहे.शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याविषयी दोन्हीकडून चाचपणी सुरू आहे. चर्चाही सुरू आहे. पण जागा वाटपाविषयी अजून दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा झालेली नाही. पण अजित पवार यांच्यासोबत आघाडी नकोच अशी भूमिका शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. या बड्या नेत्याने राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून प्रशांत जगताप यांनी दादांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी नको असा सूर आळवला आहे. त्यांनी यापूर्वी शरद पवार यांची भूमिका घेतली होती. त्यांनी महाविकास आघाडीसोबत महापालिका निवडणूक लढवल्यास काय फायदा होईल, याचे गणित मांडले. तसेच अजित पवार यांच्यासोबत निवडणूक लढवल्यास काय तोटा होऊ शकतो, याचीही माहिती मांडली होती. त्यानंतर शरद पवार यांनी दादांच्या अजितदादांसोबत न जाण्याचे ठरल्याचे प्रशांत जगताप यांनी माध्यमांसमोर जाहीर केले होते. पण त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक नेत्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याविषयी चर्चा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर चर्चा सुरु झाली होती.


तर प्रशांत जगताप या घडामोडींमुळे नाराज होऊन राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. प्रशांत जगताप यांनी पक्षासमोर राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याचेही समोर येत होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार असतील तर पक्ष सोडणार, अशी भूमिका जगताप यांनी जाहीर केली होती. प्रशांत जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता सकाळपासूनच वर्तवण्यात येत होती. अखेर त्यांनी शरद पवार राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. प्रशांत जगताप दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन दिवसांत प्रशांत जगताप करणार निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.