वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली । बहुचर्चित असलेलं वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूने 288 तर 232 एवढी मतं पडली. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं होतं. अखेरीस मध्यरात्र उलटल्यावर झालेल्या मतदानामधून वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यात झालं.
हे वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होत असताना मोठा गोंधळ झाला. दुपारी 12 वाजता सादर केलेल्या या बिलावर रात्री उशीरापर्यंत मोठा गोंधळ सुरु होता. अखेर वक्फ सुधारणा विधेयकाच्या समर्थनात 288 मतं पडल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं.
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर आता हे विधेयक आज राज्यसभेत सादर केले जाणार आहे. लोकसभेत यावर 12 तासांपेक्षा अधिक वेळ चर्चा झाली. यावेळी विरोधी आणि सत्ताधारी पक्षानेदेखील आपली भूमिका जाहीर केली. विरोधकांकडून या विधेयकाला असंवैधानिक ठरवण्यात आले. एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या विधेयकाला विरोध करताना विधेयकाची प्रत सभागृहात फाडली.