साहित्य संमेलनाला पुन्हा गालबोट ; विनोद कुलकर्णींवर हल्ला, तोंडाला काळे फासले
गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यामध्ये अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु होती. मात्र याच दरम्यान साहित्य संमेलनाला वादाचे गालबोट लागलेय. साताऱ्यात विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्यांना काळे फासण्यात आलेय. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.
1 जानेवारी रोजी या संमेलनाला सुरुवात झाली आहे. साहित्य संमेलनाच्या स्थळीच विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आलेय. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.या हल्ल्यानंतर विनोद कुलकर्णी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.


माझ्यावर हल्ला का झाला? याबाबत मला कोणताही माहिती नाही. माझा प्राण गेला तरी मला पर्वा नाही. पण मी माझे काम थांबवणार नाही. पोलिसांनी आरोपींना शोधावे, अशी प्रतिक्रिया विनोद कुलकर्णी यांनी दिली. हल्ला करणारे हल्लेखोर कोण होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामधील कारण काय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.