वीज स्वस्त नव्हे महागली; लघु, मध्यम उद्योजकांना ‘शॉक’

0

मुंबई । एकीकडे राज्यात वीजदर स्वस्त होणार असल्याचा राज्य शासन करत, मात्र वीजदरात कपात नव्हे तर वाढ करण्यात आलीय. वीजदर 0 ते 15 टक्क्याने महागणार आहे. ऊर्जा शुल्क, वहन शुल्क, कायम आकार वाढला आहे. यामुळे उद्योजक शासनावर संताप व्यक्त करत आहेत.

औद्योगिक ग्राहकांसाठी वीस किलोवॅट (अश्वशक्ती) हून कमी क्षमतेची विद्युत जोडणी असेल तर कायम आकार (फिक्स चार्ज) 583 रुपये होता. तो आता 1 जुलै 2025 पासून 600 रुपये करण्यात आला आहे. प्रति किलोवॅट कायम आकार 17 रुपयांनी वाढला आहे. म्हणजे विद्युत जोडणी जर 18 किलोवॅट क्षमतेची असेल तर कायम आकार 10 हजार 494 रुपयांवरून 10 हजार 800 रुपये होणार आहे. वीस किलोवॅटहून अधिक क्षमतेच्या जोडणीसाठी कायम आकार प्रति किलोवॅट 12 रुपये वाढला आहे.

ऊर्जा शुल्क 39 ते 64 पैसे वाढले
औद्योगिक ग्राहकांच्या 20 किलोवॅटपेक्षा कमी क्षमतेच्या जोडणीसाठी ऊर्जा शुल्क प्रति युनिट 6 रुपये होते. ते आता 1 जुलैपासून 6.39 रुपये होणार आहे. प्रति युनिट 39 पैसे वाढ झाली आहे. 20 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या जोडणीसाठी ऊर्जा शुल्क 7.12 रुपयांवरून 7.76 रुपये झाले आहे. प्रति युनिट तब्बल 64 पैसे वाढ झाली आहे.

वहन शुल्क 22 ते 30 पैशांनी वाढले
औद्योगिक ग्राहकांच्या 20 किलोवॅटपेक्षा कमी क्षमतेच्या जोडणीसाठी वहन शुल्क 1.17 रुपयांवरून 1.47 रुपये झाले आहे. प्रति युनिट 30 पैसे वाढ झाली आहे. 20 किलोवॅटहून अधिक क्षमतेच्या जोडणीसाठी वहन शुल्क 1.17 रुपयांवरून 1.39 रुपये झाले आहे. प्रति युनिट 22 पैशांनी वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.