माणिकखांब गावच्या “वनदेव डोंगरावर” जागतिक पर्वत दिन साजरा

0

इगतपुरी | 

घोटी शहरातील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक स्वतःचे काम धंदा,व्यवसाय आणि सांसारिक सर्व जबाबदारी पार पाडत सतत तीन दशकांपासून सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले,सर्वोच्च शिखर,डोंगरदऱ्या व पर्वतांवर भ्रमंती करीत ऐतिहासिक,धार्मिक,सामाजिक विविध प्रेरणादायी उपक्रम राबवून निसर्गाविषयी आस्थापूर्वक जनजागृती करीत आहे.पृथ्वीचा २७% भूभाग पर्वतांनी व्यापला आहे, जागतिक संयुक्त राष्ट्र संघाने पर्वतांच्या महत्वाकडे जगाचे वाढणारे लक्ष पाहून तसेच पर्वतांच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी ११डिसेंबर २००३ पासून जागतिक पर्वत दिन घोषित केला.

या पर्वतदिनाचे औचित्य साधत कळसुबाई मंडळाच्या गिर्यारोहकांनी तालुक्यातील माणिकखांब गाव येथील सह्याद्रीच्या निसर्गरम्य पर्वतरांगेने आणि विविध धरणांच्या पाण्याने वेढलेल्या व ऐतिहासिक कावनई किल्ल्यालगत असलेल्या “प्राचीन वनदेव डोंगरावर” जाऊन निसर्गातील पर्वतस्थित “वनदेवाचे” पूजन केले.पर्वत,शिखर,डोंगरदऱ्या,गडकिल्ले,वनराई,पशूपक्षांचे प्लास्टीक केरकचरा इतर घातक रसायनांपासून तसेच विविध कारणांमुळे त्यांची होणारी हानी टाळून निसर्गाचे संरक्षण व्हावे.तसेच पर्वतांचे महत्व त्यांची वर्तमान आणि भविष्यकालीन स्थितीचा विचार करून भावी पिढीने निसर्गाचे अस्तित्व जतन करावे तसेच संवर्धनाविषयी जनजागृती करण्याबाबतचा संदेश सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न कळसुबाई मित्र मंडळाने जागतिक पर्वत दिनी केला.अशा प्रकारे जनजागृतीच्या उद्देशाने वनदेव पर्वतावर “जागतिक पर्वत दीन” मंडळाच्या गिर्यारोहकांनी भारत मातेच्या व शिवरायांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात साजरा केला.

या पर्वत दिनात कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे,संदीप चव्हाण,सुनील चव्हाण,डॉ.महेंद्र आडोळे,काळू भोर,निलेश पवार,गोकुळ चव्हाण,सुरेश चव्हाण,भागीरथ म्हसने,संजय शेवाळे,गोकुळ सूर्यवंशी,लक्ष्मण जोशी,नामदेव जोशी,सोमनाथ भगत,भगवान तोकडे,नाना टाकळकर,चेतन जोशी,शिवदास जोशी,सोपान चव्हाण,भगवान चव्हाण,हनुमान चव्हाण,गुरुनाथ चव्हाण,नवनाथ आडोळे,गोविंद चव्हाण,बबन चव्हाण,ज्ञानेश्वर चव्हाण,कारभारी चव्हाण,डॉक्टर रॉय,पोपट भोईर,देविदास पाखरे यांसह असंख्य गिर्यारोहक सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.