इगतपुरी :
मोटार सायकलवर देश भ्रमंतीसाठी निघालेल्या पंजाबी युवकाला नाशिकहुन मुंबईकडे जात असतांना वाडीवऱ्हे परिसरात मारहाण करून लुटणाऱ्या तीन आरोपींच्या वाडीवऱ्हे पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पंजाबहुत देश भ्रमंतीसाठी निघालेले पंजाबी युवक नाशिकहुन मुंबईकडे जात असतांना वाडीवऱ्हे शिवारात तीन अज्ञात युवकांनी त्यांना एकटे गाठून त्यांना जबर मारहाण व चाकुने वार करून जखमी करत रक्त भंबाळ केले होते.
तसेच त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम लटुन पसार झाले होते. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांनी तात्काळ तपास करून या घटनेतील कृष्णा दशरथ दिवटे, वय २१ वर्ष, विकास गणपत डगळे, वय २० वर्ष, रोहन केरु रौदळ, वय १९ वर्ष, सर्व रा. लहांगेवाडी, ता. इगतपुरी यांना शिताफीने अटक करून आरोपींकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल व वापरलेले वाहन हस्तगत केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील बिऱ्हाडे, सोनाली कंखरे, पोलीस हवालदार शिरीष गांगुर्डे, प्रवीण काकड, हेमंत तूपलोंढे, उल्हास धोंडगे यांनी केली.