उन्मेष पाटील यांनी केले भाजपवर गंभीर आरोप ; म्हणाले
जळगाव । शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मतदानाच्या दिवशीच मंत्री गिरीश महाजन आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहे.
“ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महिला बचत गटाला महिलांसाठी काम करायचं सोडून मतांसाठी काम करायला लावलं आहे. बचत गटच्या महिलांना फोन पेवरून पैसे वाटायला लावत आहे. त्यांना दमदाट्या सुरू आहेत. सकाळपासून मला फोन येत आहेत”, असं उन्मेष पाटील म्हणाले.
तसेच जळगावात काल चौधरी नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला, असं सांगितले गेलं. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. दबावतंत्र, दादागिरी, दहशतीचे प्रकार सुरू आहेत”, असल्याचंही ते म्हणाले.
“हिंगोली गावातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला धमकवलं. डुबलीकेट मतदान करू द्या यासाठी त्या अधिकाऱ्याला बुतवर दमदाटी केली. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला चक्कर येऊन छातीत कळ आली आणि त्याला हार्ट स्पेशलिस्टकडे दाखल केलं आहे.आमदारांच्या गावात प्रचाराला गेल्यावर लाईट बंद केली गेली. ही कुठली संस्कृती आहे?”, असा सवाल उन्मेष पाटील यांनी केला.