महाविकास आघाडीमधून मोठी बातमी? शिवसेना ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढणार?

0

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन वाद सुरु आहे. अनेक बैठकांमध्ये अजून शिवसेना आणि काँग्रेसमधील काही जागांवरील वाद मिटला नाही. अशामध्ये आता महाविकास आघाडीमधून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच जागांसाठी ठाकरे गटाने तयारी केली असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वादामुळे आता शिवसेना ठाकरे गटाने सर्वच जागा लढवण्याची तयारी केली आहे. विधानसभेच्या सर्वच जागांसाठी ठाकरे गटाने बैठका करून आपली तयारी केल्याची सूत्रांची माहिती आहे. जागावाटपावरून काँग्रेससोबत वैचारिक मतभेद असल्यामुळे ठाकरे गटाचा प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार आहे. आले तर सोबत नाहीतर शिवाय असं विधानसभेला आक्रमक रित्या सामोरे जाण्याची ठाकरे गटाची रणनीती आहे.

तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेमुळे काँग्रेसनेही स्वबळाची तयारी सुरु केलीची माहिती समोर आली आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांची भाजपसोबत जवळकी वाढली आहे. संजय राऊत आणि अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट झाली. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट झाल्याच दावा काँग्रेसच्या सूत्रांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.