उद्धव ठाकरेंवर कारवाई करा ; निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई | लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईमधील मतदानादिवशी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, असे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची केंद्रिय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. मतदान काळात पत्रकार परिषद घेत आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, असे आदेश आता केंद्रिय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.