तुरीच्या दरात थेट ११६० रुपयांनी घसरण

0

जळगाव । सोयाबीन, कापसापाठोपाठ आता तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बाजारात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट ११६० रुपयांनी घसरण झालीये. तर गेल्या आठ दिवसात तुरीचे दर सतत घसरले आहेत.

जळगावात सध्या तुरीला ८०८५ रुपये इतका भाव मिळतोय. तर सरासरी भाव हा 8 हजार रुपयांच्या जवळपास आहे. मागील आठ दिवसात नव्या तुरीच्या दरात १६०० ते १७०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे या हंगामात देखील शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत तूर घरात साठवून ठेवण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी तुरीला किमान ९ हजार २५० तर कमाल ९ हजार ८११ रुपये म्‍हणजे सरासरी ९ हजार ५३० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र त्यात आता पुन्हा मोठी घसरण झाली. सध्या तुरीला ८०८५ रुपये इतका भाव मिळतोय

राज्यात काही ठिकाणी हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तरी सर्व बाजार समित्यांवर ही केंद्रे नसल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर सोयाबीन वाहून नेण्यासाठी मोठा खर्च होत आहे. वाहतुकीचा खर्च न परवडल्यामुळे शेतकरी आपले सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांना 4000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे विकत आहेत. राज्य व केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून राज्यभरातील सर्व बाजार समित्यांमध्ये सरकारी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.