प्रवाशांची होणार गैरसोय, जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या या गाड्या रद्द
जळगाव । उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांना गर्दी दिसून येत असून मात्र यातच रेल्वेकडून तांत्रिक कामांमुळे गाड्या रद्द केल्या जात आहे. अशातच जळगाव व भुसावळमार्गे धावणाऱ्या ४ रेल्वे रद्द केल्या आहेत. मेरामंडली ते हिंदोल रोड विभागात रेल्वे लाइन जोडण्याचे काम १५ ते २४ एप्रिल दरम्यान होणार आहे. त्यामुळे या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
कोणत्या रेल्वे रद्द?
१२१४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्स्प्रेस १३ एप्रिल रोजी रद्द केली आहे. १२१४६ पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस १५ एप्रिलला, तर जळगावमार्गे धावणारी १२९९३ गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस १८ एप्रिलला रद्द असणार आहे आणि १२९९४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस ही २१ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे.


उधना-मालदा टाऊन दरम्यान नवीन एक्स्प्रेस
दरम्यान, पश्चिम रेल्वेने उधना-मालदा टाऊन दरम्यान दोन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही रेल्वेंचे वेळापत्रक जाहीर केले असून ही रेल्वे भुसावळ मार्गे धावणार आहे. गाडी क्रमांक ०३४१८ उधना-मालदा टाऊन उन्हाळी विशेष रेल्वे १४ एप्रिलला धावणार आहे. तर गाडी क्रमांक ०३४१७ मालदा टाउन-उधना उन्हाळी विशेष रेल्वे ही १२ एप्रिलला धावणार आहे.
या स्थानकांवर थांबा?
या दोन्ही रेल्वेंना चालठाणा, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, उपाध्याय, बक्सर, आरा, पटना या स्थानकांवर थांबा असणार आहे.