भुसावळ रेल्वे स्थानकावरून आता तिरुपतीला जाण्यासाठी थेट रेल्वे

0

भुसावळ | भुसावळ रेल्वे स्थानकावरून आता तिरुपतीला जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध झाली आहे. गाडी क्रमांक ०७७१७ व ०७७१८ काचेगुडा हिसार विशेष गाडीची सेवा आता तिरुपतीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

गाडी क्रमांक ०७७१७ व ०७७१८ तिरुपती- हिसार-तिरुपती या गाडीच्या २४ फेऱ्या होणार आहे. गाडी ०७७१७तिरुपती ते हिसार ही विशेष गाडी ९ जुलैपासून ते २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत दर बुधवारी तिरुपती येथून रात्री ११.४५ वाजता सुटेल व शनिवारी दुपारी २.५ वाजता हिसार येथे पोहोचेल. गाडी ०७७१८ हिसार ते तिरुपती ही विशेष गाडी १३ जुलैपासून ते २८ सप्टेंबरपर्यंत दर रविवारी हिसार येथून रात्री ११.१५ वाजता सुटेल व बुधवारी सकाळी ११.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल.

गाडीला रेनिगुंटा, रझमपेट, कड्डूपा, येर्रगुंटला, ताडीपत्री, गुत्ती, गुंटकळ, धोन, कुर्नूल सिटी, गदवाल, महबूबनगर, जडचर्ला, काचीगुडा, मलकाजगिरी, मेडचल, कमारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मन्दसौर, नीमच, चित्तौडगड, भीलवाडा, बिजैनगर, नसीराबाद, अजमेर, किशनगढ, फुलेरा जंक्शन रिंगस जंक्शन, सीकर जंक्शन, नवालगढ, झुंझुनू, चिरावा, लोहारू, सादुलपूर येथे थांबा असेल. गाडीला २० तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे, २ सामानवाहू, गार्ड ब्रेक व्हॅन्स अशी २२ डब्यांची रचना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.