एम.फिल बाबतचा प्रश्न लवकरच निकाली निघेल; यु.जी.सी. सचिव यांचे शैक्षिक महासंघास आश्वासन

0

आज महाराष्ट्रातील अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या शिष्टमंडळाने विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा .डॉ. मनीष जोशी यांची भेट घेतली . अ.भा.शै. महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना विविध मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी एम फील च्या विषयावर प्रा. मनीष जोशी व शिष्ट मंडळामध्ये चर्चा झाली व हा प्रश्न लवकरच निकाली काढू असे आश्वासन शिष्ट मंडळाला सचिवांनी दिले तसेच संशोधन अनुदान, (रिसर्च प्रोजेक्ट) पीएचडी गाईडशीप व इतर विषयांचे संदर्भात त्यांनी चर्चा केली.

या शिष्ट मंडळामध्ये एनमुक्ताचे केंद्रीय सचिव प्रा. डॉ. पवन पाटील तसेच नांदेड येथील सदस्य, प्रदेश उपाध्यक्ष प्रा .डॉ. दीपक बच्चेवार, नांदेड विद्यापीठाचे शैक्षिक महासंघाचे सचिव प्रा .डॉ. ज्ञानोबा मुंडे, संभाजीनगर येथील प्रदेश सहसचिव, प्रा. डॉ. दिलीप अर्जुने यांचा सहभाग होता.

Leave A Reply

Your email address will not be published.