सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी वाचविले तीन गुरांचे प्राण

0

हिंगोली जिल्ह्यातील तालुका सेनगाव असलेल्या शहरात देवाला सोडलेले मोकाट दोन गोरे व एक गाय असे तीन गुरे रात्रीच्या वेळी एसटी बस स्टँड समोर मेन रोडवर पडलेले दिसले रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशन सेनगावचे पोलीस निरीक्षक तांबे व ए पी आय सोनकांबळे व त्यांचे काही कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना रात्रीच्या दोन च्या सुमारास हे तीन जनावरे बस स्टँड समोरच्या रोडवर पडलेले दिसले

हे बघताच पीआय तांबे यांनी पशुवैद्यकीय डॉक्टर श्रीकांत देवकर यांना फोन करून घटनास्थळी बोलावले डॉक्टरांनी त्या तीन जनावरांना तपासले असता त्यांच्या खाल्लेल्या अन्नातून वीजबादा झाल्याचे लक्षात आले कारण की जनावरांचे पोट फुगलेले दिसले त्यांनी घटनास्थळीच औषध इंजेक्शन व सलाईन लावून घटनास्थळी उपचार सुरू केले असून आता त्या तीन जनावराची तब्येत स्थिर असल्याचे दिसून आले आहे पोलीस स्टेशनचे पीआय तांबे व एपीआय सोनकांबळे या दोघांच्या पर्यतनामुळे व डॉक्टर श्रीकांत देवकर यांच्या ताबडतोब केलेल्या उपचारामुळे ते दोन गोरे व एक गाय यांचे प्राण वाचले पोलीस प्रशासनाने दाखवून दिले की माणसासारखाच जनावरालाही जीव असतो व त्यांची काळजी आपणच घ्यावी हे ह्या केलेल्या कामगिरीतून स्पष्ट झाल्याचे दिसत आहे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली दिलीप गायकवाड

Leave A Reply

Your email address will not be published.