धुळ्यातील मा.ध.पालेशा वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट इनडक्शन प्रोग्राम कार्यक्रम
धुळे । येथील मा.ध.पालेशा वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट इनडक्शन प्रोग्राम हा ग्रंथालय विभाग, विद्याथी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग यांच्यामार्फत दरवर्षी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विविध कार्यक्रम, विविध योजना, फी सवलती, शिष्यवृत्ती संबधी माहिती व्हावी यासाठी सदर कार्यक्रम घेण्यात येतो.
सर्व प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.प्रभाकर महाले यांनी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध कार्यक्रम,योजना व महाविद्यालयाविषयी माहिती दिली. त्यानंतर ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.चंद्रशेखर वाणी यांनी ग्रंथालय विभागातर्फे पावर पोईन्ट प्रेसेनटेशन द्वारे विद्यार्थ्यांना ग्रंथालय विभागातील नवनवीन योजना, महापुरुष यांच्या जयंती निमित्त ग्रंथालय विभागातफे होणारे ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथालयाचे नियम, यू.पी.एस.सी., एम .पी.एस.सी. बँक भरती,रेल्वे भरती,अशा अनेक स्पर्धा परीक्षा संबधी असणारे विविध ग्रंथ तसेच ग्रंथालयामध्ये नियमित येणाऱ्या व जास्तीत जास्त ग्रंथ घेणाऱ्या विद्यार्थ्यांला महाविद्यालया तर्फे विविध बक्षिसे, प्रमाणपत्र देण्यात येतात या विषयी माहिती दिली.
त्यानंतर क्रीडा विभातर्फे अंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये असणा-या विविध क्रीडा प्रक्राबाबतची माहिती, विविध क्रीडा प्रकार स्तर,अन्तर म्हविद्यालीयीन स्पर्धा क्रीडा प्रकार स्पर्धा, अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सहभाग होण्यासाठी पात्रता नियम, क्रीडा विभागाचे नियम, सहभागासाठी आवश्यक कागद पत्रे, शिक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील विविध स्पर्धेतील सहभाग व मिळालेल्या प्राविण्य /विशेष कामगिरी विद्यार्थ्यांनसमोर माडण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये होणार्या विविध कार्यक्रमाचे थोडक्यात माहिती देण्यात आली. विविध कार्यक्रमाचे विविध फोटो पीपीटी माध्यमाद्वारे दाखविण्यात आले , त्यानंतर एन.एस. एस. विभागातफे डॉ.हेमंत जोशी यांनी सर्व राष्ट्रीय सेवा योजना या विषयी सर्व कार्यक्रमाची माहिती दिली. त्यानंतर प्रा.बी.एस.काळे यांनी विद्यार्थी विकास विभागातफे विद्यार्थाच्या विकासासाठी असणाऱ्या सर्व कार्यक्रमाची माहिती सागितली. सदर कार्यक्रमाचे आभार प्रा.एम .एम.मून यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहकारी प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.