राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी; सर्वोच्च न्यायालयाने दिली अंतिम तारीख
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या बऱ्याच काळापासून रखडल्या होत्या. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने ४ आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक पुढे ढकलण्यासाठी अर्ज करण्यात आला. जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक पुढे ढकला, असं या अर्जात म्हटलं होते. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असून याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील याचिकेवर सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्या, असा स्पष्ट आदेश दिला आहे. ३१ जानेवारी २०२६ नंतर तारीख वाढवून देणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच नोव्हेंबर २०२५ पर्यंत EVM पुरवण्याचे देखील आदेश दिले आहेत.

