स्थानिक निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?
नवी दिल्ली : सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. पण निवडणुकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग केल्याचे समोर आलेय. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
त्यामुळे राज्यातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. इच्छूकांना आणखी वेटिंगवरच थांबावे लागणार आहे. राजकीय आरक्षणाच्या मर्यादेवर कोर्ट काय निर्णय घेतेय, त्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. जर कोर्टाकडून आरक्षणाबाबत नवे आदेश दिल्यास आयोगाला पुन्हा एकदा तयारी करावी लागेल. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत आयोगाला नव्याने करावी लागेल. तसे झाल्यास राज्यातील निवडणुका लांबणीवर पडतील, असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय होते याकडे सर्व राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.


50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण
नंदुरबार 100%
पालघर 93%
गडचिरोली 78%
नाशिक 71%
धुळे 73%
अमरावती 66%
चंद्रपूर 63%
यवतमाळ 59%
अकोला 58%
नागपूर 57%
ठाणे 57%
गोंदिया 57%
वाशिम 56%,
नांदेड 56%
हिंगोली 54%
वर्धा 54%
जळगाव 54%
भंडारा 52%
लातूर 52%
बुलढाणा 52%