चोपडा शहरात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोघांना चिरडले

0

चोपडा । चोपडा शहरात स्वस्तिक टॉकिज परिसरात एसटीचे ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली. ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील स्वस्तिक टॉकिज परिसरात हा गजबजलेला असून या भागात आज भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दोन दुचाकींना चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात पहिल्या दुचाकीवरील रविंद्र बहारे (वय ४०) रा.चुंचाळे आणि दुसऱ्या दुचाकीवरील सोनू उर्फ रईस पठाण (वय-२२) रा.चोपडा यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिता बहारे आणि शाकीर शेख हे जखमी झाले आहे.

जखमींना तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही थरारक घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान ही अपघात बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तातडीने उपजिल्हा रूग्णालयात धाव घेवून मयतांच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे. यावेळी उपजिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.