मोठी बातमी! शिंदेंना एकटं सोडून शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार
मुंबई । राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. या महायुतीत राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा असे तिन्ही पक्ष एकत्रितपणे सत्तेवर आहेत. मात्र महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या सर्वच मंत्र्यांनी थेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे नाराज होऊन शिंदेंच्या शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदेंशिवाय एकही शिवसेना नेता मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्हता. भाजपात होणारे पक्षप्रवेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे.


विशेष म्हणजे कॅबिनेटची बैठक आटोपल्यानंतर शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पोहोचले. या दालनात सध्या देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरु आहे.