धुळ्यातील माजी आमदार अनिल गोटेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

0

धुळे : धुळ्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलीय. धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी गोटे यांच्या हातात शिवबंधन बांधून हाती भगवा देत धुळे शहर विधानसभेसाठी उमेदवारी देखील जाहीर केली. तसेच ठाकरे गट शिवसेनेतर्फे अनिल गोटे यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे.

धुळ्यातील माजी आमदार अनिल गोटे यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आतापर्यंत सुरु होती. अनिल गोटे यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारी जाहीर होत असल्याने महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू होती. या दरम्यान गोटे यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रवेश केला आहे. तसेच ठाकरे गट शिवसेनेतर्फे अनिल गोटे यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षातील नाराज कार्यकर्ते व पदाधिकारी आता काय भूमिका घेतात यावर पुढचे समीकरण अवलंबून राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.