शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने राजकारणातील सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले
शिवराज पाटील चाकूरकर यांना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांची श्रद्धांजली
नागपूर | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक सभ्य,सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशी शोकसंवेदना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी व्यक्त केली आहे.


आपल्या शोक संदेशात शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणतात की, शिवराज पाटील चाकूरकर यांनी देशाच्या तसेच राज्याच्या राजकारणात,समाजकारणात लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला होता. अत्यांत मुळे साधेपणा मुळे आणि नैतिक मूल्यांच्या जपनुकीने त्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती.
प्रचंड अभ्यास,मराठी,इंग्रजी ,हिंदी भाषेवर असलेले प्रभुत्व तसेच प्रभावी मांडणी हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकीय प्रवासाचे विशेष गुण राहीले त्याच्या निधनाने एक अभ्यासू , लोकनेत्याला आपन मुकलो आहोत अश्या भावना पालकमंत्री मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केल्या.
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यानी लातूरचे नगराध्यक्ष पदापासून ते लोकसभा सभापती , केंद्रीय संरक्षण , वाणिज्य,विज्ञान व तंत्रज्ञान,गृहमंत्री, खात्याचे ममहाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशी विविध पदे भूषवत असताना त्यांनी राजकारणातील नैतिकता कायम हिरीरीने जपली. लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले. भारतीय संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.