टीन्स कॅटेगरीमध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने जिंकला ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब

0

चिंचवडमध्ये पारंपरिक जल्लोषात संपन्न भव्य सोहळा
चिंचवड पारंपरिक जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात “श्रावण सुंदरी 2025” हा भव्य सोहळा आज (17 ऑगस्ट) चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला.
PCMC मधील फॅशन इंडस्ट्रीतील मोठं नाव आयोजक सौ. सई तापकीर यांच्या उत्तम नियोजनात व फॅशन ग्रूमर योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.कॅटेगरी विनर्स नाव किडस सानिका सावळे टीन्स शर्वरी कांबळे जिया देव्हारे सौ. सरिता बेगुडेओम काळे या स्पर्धेचे परीक्षण Mrs. जाहिरा शेख, मंगेश सर आणि विकी शिंदे यांनी केले. कसून परीक्षणानंतर योग्य विजेते ठरवण्यात आले.फॅशन शो, मंगळागौर खेळ, मेकअप स्पर्धा यांसारख्या उपक्रमांमुळे कार्यक्रम रंगतदार झाला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.आयोजिका सौ. सई तापकीर यांनी सांगितले, “हा सोहळा म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळेच कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.”

Leave A Reply

Your email address will not be published.