दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची घोषणा 12 तारखेला? शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट काय?

0

मुंबई । उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी घडत आहे. कालच राष्ट्रवादीचे नेते वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? यावरही चर्चा सुरू आहे. यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी अनेक गोप्यस्फोट केले आहेत. १२ तारखेला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शिक्कामोर्तब होणार होते, पण अजितदादांचा अपघाती निधन झाले अन् चर्चा थांबली, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी अजितदादा यांनी इच्छाही सांगितले.

अजितदादादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात यावर चर्चा सुरू होती. मी या चर्चेत नव्हतो, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय 12 तारखेला जाहीर होणार होता, पण अजित पवार यांचं अपघाती निधन झाले, आता चर्चेला खंड पडला, असा गौप्यस्फोटही शरद पवारांनी केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती असेही ते म्हणाले.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मी सकाळी वाचलेय, मला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती, असे शरद पवार म्हणाले. अजितदादा पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्यामुळे पक्षाने निर्णय घेतला असेल. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीति दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, शरद पवारांना पत्रकारांनी शपथविधीला जाणार का? असा सवाल केला, त्यावर बोलताना ते म्हणाले की, शपथविधीसोहळ्याबाबत काहीही माहिती नाही. मी तर इथे (बारामतीत) आहे, मग कसा जाणार?

Leave A Reply

Your email address will not be published.