हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका उपाध्यक्षपदी शामराव देशमुख यांची वर्णी
जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड. सेनगाव तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्षपदी शामराव देशमुख यांची निवड करण्यात आली असून यावेळी नियुक्तीपत्र भाजपा तालुका अध्यक्ष हिम्मत राठोड यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे हे होते यावेळी मान्यवर केके शिंदे युवा नेते शिवाजीराव मुटकुळे तालुका अध्यक्ष सेनगाव हिम्मतराव राठोड माणिकराव लोंढे सरचिटणीस भाजपा, हिंगोली विजय रोकडे माजी सभापती संतोषराव घोडके माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव घोगरे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष राव टेकाळे पानकनेरगाव चे सरपंच व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी शामराव देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या