महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील सर्व शाळा उद्या बंद राहणार; नेमकं कारण काय?

0

मुंबई । राज्यातील सर्व शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, राज्यातील शाळा 5 डिसेंबर रोजी बंद राहण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे.

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा राज्यव्यापी संप पुकारला आहे.

शिक्षक संघटनांच्या या संपादरम्यान, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेत उपस्थित न राहता जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढणार आहेत, ज्यामुळे शाळांचे कामकाज थांबण्याची शक्यता आहे.

काय आहेत मागण्या?
टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशा विविध प्रलंबित मागण्या आहेत

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या या आंदोलनामध्ये सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक भारती, मुख्याध्यापक महामंडळ यांच्यासह इतरही संघटना आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनात सहभागी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.