राज्य सरकारने वाजतगाजत सुरू केलेली ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना अखेर बंद

0

मुंबई । राज्य सरकारने गेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात आणि वाजतगाजत सुरू केलेली योजना बंद केली आहे. ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना अखेर बंद करून गुंडाळली आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना अवघ्या एका वर्षातच गुंडाळण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. दरम्यान यापुढे गणवेशाचा रंग आणि रचना निश्चित करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होऊनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नव्हता. त्यामुळे सरकारने ही योजना रद्द केली आहे.

विद्यार्थ्यांना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ किंवा फुल पँट तर विद्यार्थिनींना गडद निळ्या रंगाचा पिनो-फ्रॉक, आकाशी शर्ट, गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असा गणवेश ठरवण्यात आला होता. तर ज्या शाळांमध्ये विद्यार्थिनींना सलवार-कमीज असा गणवेश असेल तिथे निळ्या रंगाची सलवार, आकाशी रंगाची कमीज असा गणवेश निश्चित करण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली आहे.

राज्यातील शासकिय शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत शालेय गणवेश वितरणाच्या निर्णयात सातत्याने बदल करत आता हा निर्णय पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.