मोठी बातमी ! उज्ज्वल निकमांची पुन्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती

0

मुंबई । भाजपाकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्या उज्जवल निकम यांची सरकारी वकीलपदी पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मात्र निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्य शासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २४ (८) नुसार उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केलीय. त्यामुळे आता उज्ज्वल निकम यांच्या सर्व केसेस पुन्हा सुपूर्द करण्यात आले आहे.

दरम्यान, उज्ज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. राज्य सरकारने न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून पाप केलं, उज्वल निकम भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना त्यांना सरकारी वकील करून त्यांनी सिद्ध केलं की सरकारी वकीलही भाजपचे राहणार. पण भाजपच्या उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.